Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

अवघे शहर अडकले वाहनांच्या विळख्यात

बेळगाव : विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी बाजार पेठेत तोबा गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी शहरात गर्दी होणे अपेक्षितच होते मात्र आज दुपारी शहरात एकच गर्दी पहावयास मिळाली. संपूर्ण शहर रहदारीच्या विळख्यात अडकले. सोमवारी सकाळी कामकाजाच्या वेळेत सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची सततची वर्दळ सुरू होती त्यामुळे …

Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी चौकाच्या सुशोभीकरणाला सुरूवात

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभिकरणाचे काम मागील वर्षी 6 जूनला सुरूवात झाली होती. येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि कंत्राटदारामुळे काम संथगतीने सुरू होते. शुक्रवारी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदारांनी त्वरित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी …

Read More »

“तो” दिशादर्शक पुन्हा दिमाखात उभा

बेळगाव : सुळगा-येळ्ळूर मार्गावरील मराठी भाषेतील दिशादर्शक फलकाची काही समाजकंटकाकडून नासधूस करण्यात आली होती. रविवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. परंतु सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने तो फलक पूर्ववत बसविण्यात आला आहे. येळ्ळूर -सुळगा मार्गे बेळगावहून खानापूर तसेच इतर भागातून ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वर्दळ …

Read More »

एसएसएलसी परीक्षा वेळापत्रक जाहीर; 19 आणि 22 जुलै रोजी

बेळगाव (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या एसएसएलसी परीक्षेसाठी परीक्षा मंडळाने आता दि.19 आणि 22 जुलै अशा तारखा निश्चित केल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिनांक 30 जून पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे. दि. 19 रोजी आणि 22 सकाळी साडेदहा ते दुपारी 1.30. …

Read More »

माळी गल्लीतील छत्रपती शिवाजी युवक मंडळाने वितरीत केली झोपडपट्टीतील गरजूंना अन्न पाकिटे

बेळगाव : माळी गल्ली, बेळगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ यांच्यावतीने किल्ला तलावनजीकच्या तसेच रेल्वे स्थानकानजीकच्या झोपडपट्टीतील गरीब आणि गरजूंसह जुन्या घाऊक भाजीमार्केट नजीकच्या गरजूंना अन्न वाटप करण्यात आले. बालाजी फूट वेअरचे संचालक हरीश, महालक्ष्मी स्टील सेंटरचे मालक, राजू शहापूरकर, मदन मोदगेकर, प्रदीप दरवंदर, गौरव कल्याणकर, पिंटू बडस्कर, विकी मेडिकलचे …

Read More »

आमदारांच्यावतीने गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण

बेळगाव: आमदार अनिल बेनके यांनी गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि मंजुनाथ पम्मार यांनी जिल्हा गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला भेट देऊन फेस मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. लॉकडाऊन काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महामारी विरुद्ध जिल्ह्यामधील बंदोबस्तामध्ये कार्य केलेल्या गृहरक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी …

Read More »

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये दहा हजार वृक्षारोपण कार्यक्रमाला मंडळ कार्यालय विजय नगर हिंडलगा येथे प्रारंभ करण्यात आला. ह्या प्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कोरोना काळामध्ये ऑकक्सिजनचे महत्व लोकांच्या लक्षात आले …

Read More »

प्रामाणिकपणाबद्दल नेसरी येथे शिवसेनेच्या वतीने दोघांचा सत्कार

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी ता. गडहिंग्लज येथे लोकनेते राजश्री शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंती निमित्त नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे यांचा नेसरी शिवसेना शाखेच्या वतीने प्रामाणिकपणाबद्द्ल सत्कार करण्यात आला. नेसरी येथील कु. शिवराज मनोहर देसाई या युवकाचे कामावरून येताना ५००० रुपये एवढी रक्कम मसनाई मंदिर शेजारी हरवली …

Read More »

कोवाड महाविद्यालयाकडून वृक्षारोपण…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील : सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथील सांस्कृतिक एन.एस.एस. यांच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रा.डॉ.आर डी. कांबळे …

Read More »

तानाजी सावंत यांना जिल्हा परिषदेचा गौरवशाली राजर्षी शाहू पुरस्कार घोषीत…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून कर्मचार्‍यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील (ग्रामसेवक तथा शिक्षक वगळून) इतर प्रवर्गातील कर्मचार्‍यांना २००१ पासून राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंधेला सन २०२०-२१ साठीच्या राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकुण १४ कर्मचार्‍यांना …

Read More »