खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी अनेक खात्याची कार्यालये असुन अनेक कार्यालये जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येक खात्याच्या कार्यालयातून जनतेच्या समस्या, विविध योजनाचा लाभ होतो. विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्कात राहून जनतेची सेवा करतात.
मात्र खानापूर शहरातील असे एक कार्यालय आहे. की खात्याच्या अधिकाऱ्याची तालुक्यातील जनतेला ओळख नाही. या खात्याच्या कार्यालयाची इमारत माहित नाही. या खात्यापासून खानापूर तालुक्यातील जनतेला कोणत्याही योजनेचा लाभ झाला नाही. एवढेच नव्हे तर खात्याचे अधिकारी तालुका पंचायतीच्या बैठकीलाही हजर नसतात, असे खाते म्हणजे मत्स्य पालन केंद्र आहे.
गेली कित्येक वर्षे झाली खानापूर तालुक्यातील मत्स्य पालन खात्याचे कार्यालय कार्यान्वित नाही आहे. मात्र या खात्याचे महिला अधिकारी महिण्याचा महिन्याला पगार घेतात. मात्र कामाचा पत्ताच नाही. नागरिकांना मत्स्य पालन खात्याकडून कोणतीच योजनेचा लाभ नाही. त्यामुळे या खात्याचा लाभ जनतेला केव्हा होणार. अशी चर्चा तालुक्याच्या जनतेतून होत आहे.
याबाबत तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी संबंधीत खात्याची चौकशी करून मत्स्य पालन खात्याच्या अधिकाऱ्याला जाब विचारून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …