खानापूर : घोटगाळी ग्राम पंचायत परिसरातून घोटगाळी ते शिवठाण, कोडगई, शेंदोळी केएच, शेंदोळी बीएच व इतर गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. आणि याच रस्त्याला एक लहानशी नदी वाहाते पावसामध्ये जाण्या-येण्यासाठी वाट सुस्थितीत नसते, प्रवाश्याना जवळजवळ तीस किलो मीटर पल्ला गाठून घोटगाळीला यावे लागते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे पायी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी पण जीव धोक्यात घेऊन नदी पार करावी लागते. कधीकधी अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे या नदीचे पात्र दुथडी भरून वाहून जाते त्यामुळे नदीचा किनारा तुटून वर्षभर वाहनांची गैरसोय होते. गेली तीन वर्षे पूल मंजूर होऊन सुद्धा त्याचे काम अद्याप झालेले नाही. खानापूर तालुक्याचे वर्तमान लोकप्रतिनिधी यांनी या पुलाचे भूमिपूजन करून देखील अद्याप काहीच हालचाली झालेली नाही. लोकप्रतिनिधी बनण्यासाठी या देखील परिसरातील लोकांचे सहकार्य लाभले आहे तरीदेखील लोकप्रतिनिधींचे वारंवार या लोकांकडे दुर्लक्ष होत आहे. भूमिपूजन करून या परिसरातील जनतेला आशेचे किरण दाखवले होते पण अद्याप काहीच कार्य न झाल्याने या लोकांच्या पदरी निराशाच लागली आहे़. होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी या परिसरातील लोकांनीच पुढाकार घेऊन मनुष्यबळावर लाकडाची साकव तयार केली या प्रयत्नांना यश आलेले बघून खानापूर तालुका विभागाचे युवा काँग्रेस नेते “श्रीमान इरफान ताळीकोटी” यांनी या ठिकाणी काम चालू असताना प्रत्यक्ष भेट देऊन या लाकडी पुलाचे काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करून लोकांसाठी दोन हजार रुपये गौरव धन दिले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …