Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत खोकीधारकांना न्याय

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील जांबोटी क्राॅसवरील जवळपास ७० खोकीधारकांना जत-जांबोटी महामार्गाच्या रूंदीकरण व डांबरीकरणाचे कारण दाखवुन हलविले. तसेच तहसील कार्यालयासमोरील खोकीधारकांनाही हलविले. या सर्वांना जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या भिंतीला लागुन असलेेल्या जागेवर गाळे बांधुन देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या बैठकीत झाला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.
यावेळी तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.
प्रारंभी लेखाधिकारी विवेक बन्ने यांनी स्वागत केले.
बैठकीला स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनायक कलाल, आपय्या कोडोळी, नारायण ओगले, प्रकाश बैलूरकर, हणमंत पूजारी, विनोद पाटील, महमद रफिक, नगरसेविका शोभा गावडे, मेघा कुंदरगी, मिनाक्षी बैलुरकर, लता पाटील, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, सहेरा सनदी, फातिमा बेपारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन

Spread the love  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *