
खानापूर : चिरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे. अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे.
चिरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या बाजूला दिलीप येळ्ळूरकर यांच्या घरातील पुढील भागात असलेल्या भाड्याने दिलेल्या दुकानात रामगुरवाडी ता. खानापूर येथील नामदेव नारायण माळवे यांच्या टेलर दुकानाला आज सकाळी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून नवीन कपडे, शिवण्यासाठी आणलेले कापड, तसेच दोन शिलाई मशीन, आदि साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे तर घर मालक दिलीप येळ्ळूरकर यांच्या घरच्या समोरील छत व दुकान जळून त्यांचे सुध्दा हजारो रूपयांचे नूकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेवुन आग विझवली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. खानापूर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. आज रविवार बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta