खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर आमवश्या, मंगळवार, शुक्रवार तसेच शिवरात्र आदी दिवशी भाविकांची स्नानासाठी, पुजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
यावेळी भाविक नदी घाटावर पुजा करतात. पुजेवेळी नारळ फोडले जातात. पुष्पहार, केळी, तसेच प्लॅस्टिक पिशव्या मलप्रभा नदीच्या प्रवाहात सोडुन देतात. त्यामुळे मलप्रभा नदीचे पाणी दुषित होते. त्याच पाण्याचा खानापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
यासाठी भाजप नेते आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकताच मलप्रभा नदी पात्रातील कचरा, घाटावरील प्लॅस्टिक पिशव्या, टाकाऊ नारळ, पूजेला वापरलेले पुष्पहार जमा करून मलप्रभा नदी घाट स्वच्छ करण्यात आला. यावेळी भाजप नेते आनंद पाटील, अर्जुन गावडा, संजू कोलकार, बाळेशी चव्हाण, सचिन पवार, संजीव कार्कि, भीमसेन आगसर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …