खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू आहे. सर्वच उमेदवार आपापल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत आहे.
भारतीय जनता पार्टीने देखील राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी महाराष्ट्र व केंद्रातून स्टार प्रचारक प्रचारासाठी येत आहेत. 2014 मध्ये अच्छे दिन, काळे धन, रोजगार यासारखी आमिषे दाखवून केंद्रात सत्तेत आलेलं भाजपा सरकार यावेळी जनतेला कोणती खोटी आश्वासने देणार असा सवाल सामान्य माणसाला पडला आहे. भाजपा सरकार हे पूर्णपणे अपयशी सरकार ठरले आहे. भाजपाच्या तुघलकी धोरणामुळे देश डबघाईला आला आहे. महागाईने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तळागळातील सर्वसामान्य माणसाला काँग्रेस सरकार हे आपले सर्वसामान्यांचे सरकार वाटू लागले आहे.
बेळगाव खानापूर विधानसभा मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून भाजपाच्या स्मृती इराणी येणार आहेत. काँग्रेस काळात स्मृती इराणी यांनी गॅस सिलेंडरचे भाव 300 वरून 340 रु. झाले म्हणून देशभर आंदोलने केले. त्याच स्मृती इराणी आज गॅस 350 वरून 1200 झाला यावर भाष्य करतील का? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta