खानापूर : खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन ह.भ.प. इंदुबाई ना. बंगलेकर व अनुमोदक म्हणून ह.भ.प. पुन्नाप्पा चि. बिर्जे तर उपाध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन ह.भ.प. रमेश म. पाटील व अनुमोदक म्हणून हभप. तम्माना गावडे हे होते.
खानापूर तालुक्यात गुरुकुपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीची सुरुवात होऊन 15 वर्षे पूर्ण झाली. दिवसेंदिवस या सोसायटीची भरभराटी होत असून सोसायटीने नूतन अध्यक्ष ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर व उपाध्यक्ष, संचालकांच्या मार्गदर्शनाने मागील वर्षात समर्थ नगर खानापुर येथे स्वतःची स्वतंत्र इमारत उभी केली. या सोसायटीचा तालुकयातील अनेक वारकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. सोसायटीमध्ये अनेकांनी ठेवी ठेवल्या आहेत. गरजू वारकऱ्यांना कर्ज दिले जात असून दाम दुप्पट योजना, आरडी, एफडी, पिग्मी अश्या सुविधा उपलब्ध आहेत.
नुकताच या सोसायटीच्या नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली आणि ही निवड पूर्णपणे बिनविरोध झाली. यामध्ये 3 नवीन सदस्यांना संधी देण्यात आली.
नवनिर्वाचित संचालकांची नावे खालील प्रमाणे:
1. हभप. शांताराम हेब्बाळकर, वासकरवाडी अध्यक्ष
2. हभप. विठोबा सावंत, निलावडे उपाध्यक्ष
3. हभप. तम्माना गावडे, खानापुर संचालक
4. हभप. मारुती सावंत, अंकले संचालक
5. हभप. रमेश पाटील, तिओली संचालक
6. हभप. पुन्नाप्पा बिर्जे, नागुर्डावाडा संचालक
7. हभप. शिवाजी आंबेवाडकर, बेकवाड संचालक
8. हभप. मंगल जाधव, इदलहोंड संचालक
9. हभप. इंदुबाई बंगलेकर, अस्तुली संचालक
10. हभप. कल्लाप्पा कुंभार, डुक्करवाडी (नवीन) संचालक
11. हभप. विठ्ठल मादार, रामगुरवाडी (नवीन) संचालक
12. हभप. नागप्पा मयेकर, माणिकवाडी (नवीन) संचालक
Belgaum Varta Belgaum Varta