खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर (वय दीड वर्ष) हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील तोलगी येथे घडली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खानापूर सरकारी इस्पितळात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास करत आहेत.