खानापूर : गणेबैल येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर रास्ता रोको करून आंदोलन केले. कित्येक महिने उलटून गेले तरी एनएचएआयने व केंद्र सरकारने आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. तसेच टोलपासून साधारण 5 किमी च्या अंतरातील सर्व गावातील वाहनांना टोल माफी मिळायला हवी. या मुद्यावरून काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आवाज उठवला.
गणेबैल टोलनाक्यावर भाजपच्या वेगवेगळ्या गाड्यांची लिस्ट
गणेबैल टोकनाक्यावर टोलमाफी असणाऱ्या गाड्यांची लिस्ट लावली आहे. त्याममध्ये आमदारांना टोलमाफी दिली आहे. पण या गाडीबरोबर अशा 10 गाड्यांची लिस्ट आहे यामध्ये लैला शुगरच्या गाड्यांना टोलमाफी मिळाली आहे. तसेच खानापूर भाजपातील काहींना टोलमाफी मिळाली आहे. यामुळे फक्त सामान्य जनतेला टोलमाफी का नाही असा सवाल यावेळी करण्यात आला. याची सत्यता तपासण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आणि यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा “जेल भरो आंदोलन”
वरील सर्व बाबींची पुर्तता न झाल्यास येत्या 10 जूनला “जेल भरो आंदोलन” छेडण्यात येणार असल्यास यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी खानापूर सीपीआय व टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी मिळून एसी व डीसी यांच्याशी बोलणे करून देण्यात आले, सर्व सरकारी अधिकारी 4 जूनच्या मतमोजणी प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे 5 जून नंतर नक्की भेटू अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली ती मान्य करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. ईश्वर घाडी साहेब, सुरेश भाऊ जाधव, यशवंत बिर्जे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, रमेश पाटील, जोतीबा गुरव, रूद्राप्पा पाटील, महादेव गुरव, रामचंद्र पाटील, तोहीत चांदखन्नावर, इसाक पठाण तसेच स्थानिक शेतकरी, जनता, गाड्यांचे मालक कार्यकर्ते उपस्थित होते.