खानापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 ते 8 दिवसापासून धुवांधार पाऊस पडत आहे. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत असून हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्रीस्वयंभू मारुतीच्या छतापर्यंत पाणी आले आहे. कणकुंबी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस असाच पाऊस पडला झाला तर स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाणार आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जांबोटी लिंक रोडवरील शंकर पेठ पुलाला भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta