खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर गोवा, दादर, नगरहवेली, दीव दमण या राज्यांची जबाबदारी डॉ. अंजलीताई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आजपर्यंतच्या काँग्रेस पक्षातील योगदानाचा विचार करून पक्षाने त्यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती केली आहे. यापुर्वी देखील डॉ. निंबाळकर यांनी केरळ, तामिळनाडू, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
आज डॉ. अंजलीताई निंबाळकर या गोवा दौऱ्यावर असून गोव्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे गोवा विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीला प्रभारी माणिकराव ठाकरे देखील उपस्थित होते. गोवा काँग्रेस तसेच सचिव माणिकराव ठाकरे यांनी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta