खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथे सोमवारी दि. 26 रोजी लम्पीस्कीन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या वतीने लम्पीस्कीन रोगाविषयी जागृती शिबीर भरवण्याचे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोडगू यांना देण्यात आले.
यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष अजित पाटील, सदस्य प्रसाद पाटील, सुरेश पाटील, संगमा कुंभार, कल्लापा लोहार, जोतिबा सुतार, सोमनाथ पाटील, रोहीत नवलगी, मारूती मुचंडी, आदी उपस्थित होते.