
खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि आणी दुपारी ठीक 2.00 वा. श्री माऊली देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक व मंदिरास प्रदक्षिणा होतील. नंतर बैलजोड्या फिरवीने त्यानंतर श्रीमान शामसुंदर मोहनराव केशकामत, गुंजी यांच्याकडून तीर्थप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी मानकर्यांकडून ओट्या भरणे, इंगळ्या नाहने तसेच रात्री 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल.
गुरुवार दि. 06-10-2022 रोजी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडने इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत व भाविकांच्या वतीने दु. 1.00 वा. महाप्रसाद होईल. तसेच सायंकाळी 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल. आणि रात्री 10.00 वा सोशल फौंडेशन गुंजी पुरस्कृत व चव्हाटा नाट्य मंडळ आयोजित डाकू संग्राम हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा.
शुक्रवार दि. 07-10-2022 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडने इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार. व सायंकाळी 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल.
शनिवार दि. 08-10-2022 रोजी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार व सायंकाळी 5.00 वा. श्री माऊली देवीस महानैवेद्य व देवी भंडारण्याचे गार्हाणे होऊन या उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta