नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पममात आले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून असून शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या जीवाला धोका आहे, असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले असून, यासाठी संजय राऊत यांच्या विधानाच्या एका व्हिडीओची लिंकही सादर करण्यात आली आहे.
बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर ऑनलाईन सुनावणी होणार आहेत. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, राजीव धवन, देवदत्त कामत यांनी तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे, महेश जेठमलानी, मुकुल रोहतगी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद करणार आहेत.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी नोटीस बजावली होती. त्यांना आज (दि. २७) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि प्रतोद भरत गोगावले यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बंडखोर आमदारांविरोधातील नोटीस आणि शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta