Wednesday , December 10 2025
Breaking News

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला

Spread the love

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा गेल्या जवळपास दशकभरापासून या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. आता या शिंदे गटातील 12 खासदारांनी आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत खासदारांच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन दिले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे मात्र हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरम्यान शिंदे गटातील खासदारांच्या निवेदनानंतर याप्रकरणी केंद्र सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2013 मध्ये राज्य सरकारनं नेमलेल्या भाषा समितीचा अहवाल पूर्ण झाला. तेव्हापासून जवळपास दशकभर संपूर्ण महाराष्ट्राला या निर्णयाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र सरकारनं 2012 मध्ये याबाबत एक भाषा समिती स्थापन केली, त्या समितीनं आपला अहवाल 2013 मध्ये पूर्ण केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास 9 वर्षे ही मागणी केंद्राकडे पडून आहे

देशात आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. पहिली भाषा 2004 मध्ये तामिळ आणि त्यानंतर 2014 मध्ये उडीया भाषेला मिळाला आहे. म्हणजे हे सगळे निर्णय यूपीए सरकारच्याच काळात झाले आहेत. मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर प्रादेशिक वादांची रांग नको म्हणून याबाबत अद्याप तरी निर्णय घेणं टाळलं आहे.

मराठी भाषाही अभिजाततचे निकष पूर्ण करते यात शंकाच नाही. हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून भाषेच्या विकासासाठी फंड उपलब्ध होतात. केंद्रीय विद्यापीठांमध्ये त्याची अध्यासनं तयार होतात. विविध आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपही जाहीर होतात. दरम्यान शिंदे गटातील खासदारांच्या निवेदनानंतर याप्रकरणी केंद्र सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *