माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायत ही नवनिर्वाचित नगरपंचायत आहे. माणगांव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या 25000 पेक्षा जास्त आहे. माणगांव नगरपंचायतीचे कामकाज पूर्वीच्या जुन्या इमारतीमध्ये चालत असून सदर इमारत ही 50 वर्षे जुनी आहे. दैनंदिन कामासाठी सध्याची इमारत अपुरी पडत आहे. नुकताच रायगड जिल्ह्यात चक्रीय वादळामुळे नगरपंचायतीच्या कार्यालयाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे माणगांव नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधणे गरजेचे आहे, तरी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने नवीन इमारतीसाठी 7 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta