Tuesday , March 3 2026
Breaking News

रायपूर येथे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

Spread the love

 

रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना सदर अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्‍या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्‍यू झाला तर १२ जण जखमी झाले. मृत आणि जखमी हे चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. रायपूरच्‍या पोलिसांनी म्‍हटलं आहे की, “चटौड गावातील काही लोक छठ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाणा बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते परतत होते. रायपूर-बालोदाबाजार रोडजवळ हा अपघात झाला.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *