शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला. कुल्लूमधील सेंज व्हॅलीमध्ये सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. कुल्लू जिल्ह्यातील सेंजला जाणारी बस सकाळी ८ वाजता जंगला गावाजवळ दरीत कोसळली. या बसमध्ये शाळकरी मुलांसह सुमारे ४५ प्रवाशी प्रवास करत होते. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील.