नवी दिल्ली : कोरोना मृतांच्या कुटुंबियांना कोणताही वेळ न दवडता भरपाईची रक्कम द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिले.
संबंधित लोक तक्रार निवारण समितीकडे दाद मागू शकतात भरपाईची रक्कम दिली जात नसल्याची कोणाची तक्रार असेल तर संबंधित लोक तक्रार निवारण समितीकडे दाद मागू शकतात, असेही न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तक्रार निवारण समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे अर्ज एका महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश देखील खंडपीठाने दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta