काबुल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार बायडेन म्हणाले की, “आता खरा न्याय मिळाला आहे आणि हा दहशतवादी मास्टरमाईंड आता जिवंत राहिलेला नाही,”
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता.
Belgaum Varta Belgaum Varta