नवी दिल्ली : जनतेच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. आता नागरिकांना गॅस महागाईचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. या आठवड्यात होणार्या पुनरावलोकनानंतर नैसर्गिक वायूच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नैसर्गिक वायूचा वापर वाहनांसाठी वीज, खते आणि सीएनजी निर्मितीसाठी केला जातो. यामुळे नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजीचे दरही वाढणार आहेत. देशात तयार होणार्या गॅसची किंमत सरकार ठरवते. सरकारला 1 ऑक्टोबरला गॅसच्या दरात पुढील सुधारणा करायची आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या जुन्या फील्डमधून तयार होणार्या गॅससाठी द्यावा लागणारा दर प्रति युनिट 6.1 डॉलरवरून 9 डॉलर प्रति युनिट जाण्याची शक्यता आहे. उर्जेच्या किमतीत अलिकडच्या वाढीमध्ये भर पडल्यानंतर कंपनी दर वाढवण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta