Thursday , March 5 2026
Breaking News

पीएफआयवर केंद्र सरकारकडून बंदी

Spread the love

 

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), त्यांच्या सहकारी संघटना आणि सर्व आघाड्या बेकायदेशीर घोषित केल्या आहेत. केंद्राने या सर्वांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचं अधिकृत पत्रही प्रसिद्ध केलं आहे. पीएफआयवर बंदी घालण्याची तयारी आधीच सुरू झाली होती, त्यानंतर गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.

पीएफआयवर केंद्र सरकारची कारवाई मंगळवारीही सुरूच होती. देशातील सहा राज्यांमध्ये पीएफआयच्या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 90 हून अधिक कामगारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीएफआय, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, रिहॅब इंडिया फाऊंडेशन, नॅशनल वुमन फ्रंट यासारख्या संबंधित संघटनांनाही बेकायदेशीर संघटना घोषित केलं गेलं आहे.

PFI ची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये झाली आणि ते भारतातील उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन सामाजिक चळवळ चालवण्याचा दावा करतात. मात्र, सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, पीएफआय कट्टरपंथी इस्लामचा प्रचार करत आहे. या संस्थेची स्थापना केरळमध्ये झाली असून तिचं मुख्यालय दिल्लीत आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *