जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचेही गेहलोत यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र, आता या शर्यतीतून गेहलोत यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह विरुद्ध शशी थरुर आमनेसामने येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta