Thursday , March 5 2026
Breaking News

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

Spread the love

 

नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे.
पंकज मिश्रा बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेनं देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल 1 हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना संथल परगनामधील दगड आणि वाळू उत्खननातून येणारा निधी प्रेम प्रकाश यांना द्यायला सांगितला होता. या बदल्यात प्रकाश व्यापार्‍यांकडे पैसे सुपुर्द करायचे, असे ईडी चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी खजीनदार रवी केजरीवाल यांनी सांगितले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *