दौसा (राजस्थान) : राजस्थानमधील दौसा कलेक्टर सर्कलजवळ एका रेल्वे पुलावर बसचे नियंत्रण सुटले आणि ती खाली रेल्वे रुळावर पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर 28 जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांकडून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
रेल्वे वाहतूक ठप्प झाली
अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाला. अपघातामुळे रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. एक प्रवासी बस पुलाचे रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta