Tuesday , September 17 2024
Breaking News

चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Spread the love

 

बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ

झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांनी अटक केली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेन यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध कऱण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची युती आहे. झारखंड मोर्चाकडे सदध्या 29 तर काँग्रेसकडे 17 आमदार आहेत. त्याशिवाय आरजेडीच्या एका आमदाराचाही सपोर्ट आहे. झारखंडमधील बहुमताचा आकडा 41 इतका आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हॉटेलला पाठवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. यानंतर चंपाई म्हणाले की गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी (रुपी सोरेन) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.

कौटुंबिक विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत

हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडेम मुख्यमंत्रीपदाची सूत्रं देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत असं सांगण्यात येतंय.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *