निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा नेते युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती बोरगाव यांच्यावतीने बेनाडी (ता. निपाणी) येथे मंगळवारी (ता.२२) भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष गटासाठी ५ किलोमीटर अंतर असून प्रथम ते पाचव्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर महिला गटासाठी३ किलोमीटर अंतर असून विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३ हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये, ७०० रुपये, ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. गावगन्ना पुरुष गटासाठी अनुक्रमे ३ हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये, ७०० रुपये, ५०० रुपये अशा बक्षिसांबरोबरच बालाजी ज्वेलर्स यांच्याकडून सर्व विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta