Monday , September 21 2026
Breaking News

शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा

Spread the love
निपाणी (वार्ता) : येथील शाहू नगरातील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी लावलेल्या दिल्यामुळे हनुमान मंदिर परिसर उजळून निघाला होता. तत्पूर्वी सकाळी हनुमान मूर्ती अभिषेक घालण्यात आला.
प्रारंभी नगरसेवक संतोष सांगावकर, रवींद्र इंगवले, पत्रकार राजेंद्र हजारे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर भाविकांनी हनुमान मंदिर परिसरात शेकडो दिवे लावले. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमास टाऊन प्लॅनिंग कमिटी सदस्य विश्वनाथ जाधव, अशोक बोधले, विनोद माने, समीर सय्यद, लक्ष्मण चौगुले, विजय गुंडाळे, शिवाजी निंबाळकर, रुपेश बागी, राजू इटेकरी, ओंकार निंबाळकर, सागर बोधले, मयूर बोधले, सचिन शिंदे, विकास शिंदे, अक्षय जाधव, सचिन विटेकरी, राहुल कांबळे, ओंकार खोत, श्री खोत, धीरज पोवार, सुरेश खोत, महेश जाधव, चंद्रकांत माने, बाळासाहेब जाधव, राजू पाटील प्रदीप नाईक, ललिता खोत, पारूबाई मातीवडर, राजश्री हजारे, सावित्री माने, प्राजक्ता बोधले, अश्विनी बोधले यांच्यासह भावीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *