
माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम
कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी व्यक्त केले.
हदनाळ तालुका निपाणी येथे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अमृता प्रकाश पाटील यांनी स्वागत केले.
मधुकर पाटील यांनी प्रास्ताविकात उत्तम पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन आता महिलांनी आपल्या भावाला, वयोवृद्ध नागरिकांनी आपल्या मुलग्याला तर युवकांनी आपल्या मित्राला निवडून देण्याची खरी वेळ आता आली आहे असे सांगितले.
यावेळी मत्तिवडे येथील सोनू कदम व अन्य मान्यवर नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
युवा नेते उत्तम पाटील यांचा उत्तम पाटील युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांच्या कडून शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार झाला.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार आहे. आतापर्यंत अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहे. मतदार संघात विविध विकास कामे राबवून जनतेला एकसंघ करण्याचे काम आपण करणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा. सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी कोणत्याही सत्तेची गरज नाही. काम करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम येणाऱ्या पाच वर्षात आपण करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी धनश्री पाटील, पूजा शिंत्रे, पूजा पाटील, बंडा पाटील, के. डी. पाटील, प्रकाश गायकवाड, अनिल संकपाळ, लक्ष्मण आबने, अमर शिंत्रे, निवास पाटील, राजू कोळी, किरण पाटील, आत्माराम राऊत, राजाराम कांबळे, शिवाजी कांबळे, कृष्णात पोटले, उज्वला गारगोटे, सुमित्रा माने, प्रल्हाद कांबळे, शहाजी केसरकर, शामराव केसरकर, निरंजन पाटील, गजानन कावडकर, सचिन परीट, विठ्ठल कोळेकर, मनीषा परीट, उमेश हेब्बाळे, नितीन निपिरे, विपुल मगदूम, मीनाक्षी तावदारे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेघाराणी केसरकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta