प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर : निपाणीत भरतीसाठी व्याख्यान
निपाणी (वार्ता) : काही वर्षापासून अनेक विद्यार्थी दहावी बारावीनंतर एनडीएची परीक्षा घेत आहेत. एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय सैन्य दलासह इतर ठिकाणी कार्यरत होत आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एनडीए व भरती मधील माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती पासून वंचित राहत आहेत. भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी प्रामाणिकपणा चांगल्या सवयी आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, असे मत प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांनी व्यक्त केले. येथील मुरगुड रोडवरील आराम मंगल कार्यालयात ‘एनडीए आणि त्यानंतर पुढे काय?’ याबाबत आयोजित मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते.
प्रारंभी एनडीए परीक्षा आणि सैन्य भरती याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.
प्राचार्य पालांदूरकर म्हणाले, दहावीपासूनच अनेक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित विषयाची धास्ती घेतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी मागे पडत आहेत. निरंतर अभ्यास केल्यास या धास्तीपासून दूर राहता येते. एनडीए बाबत खाजगी ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपयाचा चुराडा करावा लागतो. त्यामुळे पालकांचा अनाठायी खर्च होतो. त्यामुळे नीट आणि जेईई परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दहावी विद्यार्थ्यांना एनडीए परीक्षा देता येईल. त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील एक प्रश्न असतात. ही परीक्षा अडीच वर्षातून दोन वेळा देण्याची संधी आहे. त्यासाठी एनडीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींनाही गेल्या वर्षापासून सैनिकानात भरती होण्याची मुभा मिळाली आहे.
हवाई दलातील भरतीसाठी मुंबई नागपूर पणजी या ठिकाणी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातात. त्यामधील तीन विषयांच्या पर्यायी उत्तराच्या लेखी परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यासाठी व्याकरण चालू घडामोडीची माहिती, पुस्तकांचे वाचन, वृत्तपत्रवाचन सातत्याने ठेवून राजकारण,क्रीडा ज्ञान आकलन करणे आवश्यक आहे. यशस्वी मुलाखती पाच दिवस घेतल्या जातात त्यामध्ये उमेदवाराचा प्रामाणिकपणा नकारात्मक भूमिका चांगल्या सवयी याबाबत निरीक्षण केले जाते. या सर्व परीक्षेचे उत्तीर्ण झाल्यास प्रशिक्षणाच्या काळात अर्धा लाखाहून अधिक शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय नोकरीच्या काळात पुढील शिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदृढ आरोग्यासह विविध खेळ अभ्यासाची निरंतर सवय ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरासाठी निपाणी शहरासह उपनगर, यमगर्णी सौंदलगा, बुदिहाळ, नांगनूर, जत्राट, श्रीपेवाडी, खडकलाट, पट्टणकुडी, तवंदी गव्हाण परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta