खानापूर : एनपीएस नोकर बांधवांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी १९ डिसेंबरपासून राजधानी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे सुरू असलेल्या “करो या मरो” या आंदोलनाला कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना घटक खानापूर यांच्या वतीने संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन राज्यध्यक्ष मान्यनीय शांताराम व संघटनाप्रधान कार्यदर्शी उमेश होटद यांची भेट घेऊन खानापूर तालुका शिक्षक संघटनेचा पाठींबा जाहिर करत आपल्या सर्व पदाधिकारी वर्गाच्या समवेत आंदोलनात सतत दोन दिवस सहभागी होऊन एनपीएस बांधवाच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. आजतागायत एनपीएस बांधवांवर झालेल्या अन्यायासंदर्भात आंदोलन झाली. मग ती राजधानी बेंगलुरु, बेळगांव, धारवाड, व दिल्ली आदी ठिकाणी झालेल्या प्रत्येक आंदोलनात शेकडो ओपीएस बंधू भगिनीच्या समवेत सहभागी होऊन एनपीएस बांधवाचे नेतृत्वही केले आहे. यापुढेही एनपीएस बांधवांना न्याय मिळेपर्यंत जे जे लढे देता येथील त्या लढ्याना खानापूर तालुका शिक्षक संघटना अग्रेसर राहिल, असे संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील यांनी एनपीएसचे अध्यक्ष शांताराम यांना सांगितले आहे.
यावेळी एनपीएस पदाधिकारी वर्गानी आभार मानून असेच सहकार्य राहावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना खानापूर घटक अध्यक्ष वाय. एम. पाटील, कार्यदर्शी मलिकार्जून चवलगी, सहकार्यदर्शी बोमाजी कांबळे, कोशाध्यक्ष किरण पाटील, श्री. गौडर, श्री. किल्लोरी आदीनी सहभाग दर्शविला होती.