खानापूर : भाजपा समस्या परिहार केंद्रातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा टपाल विमा योजना आयोजित करण्यात आला होता. या सर्वांचा विमा डॉ. सोनाली सरनोबत या स्वतः करणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणल्या की, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस खानापूर आणि परिसरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जंगल भागातून व खराब रस्त्यावरून प्रवास करून नोकरीसाठी ये-जा करीत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा उतरविणे गरजेचे आहे.
यावेळी पोस्टमन ज्ञानेश्वर गुरव, राजू मुतगी, विश्वनाथ गुंजीकर यांनी ऑनलाइन पद्धतीने विमा उतरविला. पोस्ट खाते विमाधारकाला उत्तम सेवा प्रदान करते. हा विमा काही मिनिटात केला जातो. तालुक्यातील बहुसंख्य आशा कार्यकर्त्यांना व अंगणवाडी शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळाला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माऊली शाळेचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, डॉ. सोनाली सरनोबत, भाजप कार्यकर्ते अर्जुन गावडे, अनंत गावडे, सचिन पवार, संदीप गावडे, राजू मादार आदी उपस्थित होते. विम्याचा वार्षिक हप्ता नियती फाऊंडेशनतर्फे भरला जाईल.