ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार
निपाणी (वार्ता) : आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेची समस्या सोडवणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे समजून सर्वांनी शाश्वत विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधाना प्राधान्य देण्याबरोबरच लोकाभिमुख कामांनाही प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, तरच आपण लोकप्रतिनिधी बनून जनतेचा विश्वासातील कार्यकर्ता बनू शकतो, असे मत बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील सुमती या निवासस्थानी अरिहंत परिवारातर्फे शिरदवाड ग्रामपंचायतीचे नूतन अध्यक्ष जयश्री किरण पाटील, मानकापूरचे सुनील म्हाकाळे, ममदापूरचे विद्या शिंदे, बेनाडी नूतन उपाध्यक्षा मयुरी मंगावते, गजानन कावडकर, अश्विनी नरबळ यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर उत्तम पाटील यांनी, नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली. अरिहंत परिवारातर्फे सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी नूतन अध्यक्ष व नूतन उपाध्यक्षा यांचा सत्कार केला.
माझ्या अध्यक्ष निवडीमागे उत्तम पाटील यांचा मोठे सहकार्य लाभले आहे. ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता यावी, यासाठी सर्वांनी सहकार्य केलेले आहे. पुढील काळात आपण माणकापूर गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. बरोबरच आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांनाही महत्त्व देणार आहे.माणकापूर हे गाव धार्मिक परंपराचे गाव आहे यामुळे या गावाच्या संस्कृती वाढ व्हावी, यासाठी सर्वच सदस्य एकत्रित येऊन काम करणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नूतन अध्यक्ष सुनिल म्हाकाळे यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील, निरंजन पाटील सरकार, सुरेश खोत, विजय रोहिदास, यास्मिन चाऊस, रामगोंडा पाटील, कुमार पाटील, जयपाल चौगुले, सचिन बेडकीहाळे, पिंटू करवते, प्रकाश पाटील, रावसाहेब गोरवाडी, महादेव मधाळे, संभाजी पाटील, प्रभाकर मधाळे, महादेव लवटे, अभयकुमार चौगुले, जयपाल चौगुले, रूपाली चौगुले, शोभा तेरदाळे, वैशाली कुंभार, भारती करवते, संदीप बन्ने, प्रमोद शेवाळे, शोभा माळी, स्नेहल छत्रे, विलासमती माने, अलका चौगुले, राकेश चौगुले, सुनिता नाईक, सचिन शिंदे, सचिन बेडकीहाळे, अनिल म्हाकाळे, उत्तम तळपदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta