Monday , September 21 2026
Breaking News

कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!

Spread the love

 

खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या कुसमळी जवळील शेतातील काम संपून बैलांना सोडुन देताच, जवळ असलेल्या मलप्रभा नदीच्या प्रवाहातून बैल वाहुन गेला. लागलीच शेतकऱ्याने कुसमळी पुलापर्यत बैलाचा पाठलाग केला. परंतु नदीच्या प्रवाहात पाण्याचा जोर वाढला त्यामुळे बैल नदीतून शंकरपेठेच्या दिशेन वाहुन गेल्याचे शेतकऱ्याच्या दृष्टीस आले. मलप्रभा नदीच्या प्रवाहात पाण्याचा प्रवाह वाढल्याने बैल काही वेळेत नाहीसा झाला. काही शेतकऱ्यांनी मलप्रभा नदीच्या काठावर शोधा शोध केली. मात्र बैलाचा पत्ता लागला नाही.
मलप्रभा नदीच्या प्रवाहात कुणाला बैल दृष्टीस पडल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन संतोष घाडी या शेतकऱ्याने केले आहे.
संतोष घाडी यांच्या बैलाची किंमत ५० ते ६० हजार रूपये इतकी आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *