निपाणी (वार्ता) : येथील जुना पी. बी. रोड वरील बाळासाहेब ज्ञानदेव तराळे यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) घडली. या आगीत फ्रिज, टीव्ही, शिवायंत्र व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
याबाबत घटनास्थळावरून समजलेले अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री बाळासाहेब तराळे यांच्या घरातून अचानक धूर येऊ लागला. याची चौकशी केली असता शॉर्ट सर्किटने ठिणगी पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे या घटनेची माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानुसार निपाणी अग्निशामक दलाचे जवान ए. आय. रुद्रगौडर, यु. एन. पट्टण, एन. एस. कमते, सी. एस. पनर, बी. के. दोनवाडे यांनी आग आटोक्यात आणली. शुक्रवारी सकाळी देखील या ठिकाणच्या जवळच कारला आग लागली होती. पुन्हा रात्री कराळे यांच्या घराला आग लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta