निपाणी (वार्ता) : येथील १००८ आदिनाथ सैतवळ जैन मंदिल आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था,शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी १०८आचार्यश्री आर्यनंदि गूरूदेव यांच्या ११७ जन्मोत्सवानिमित्त शेतवाळ गल्ली जैन मंदिर येथे वात्सल्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रतिमेचे पूजन, जयमाला व आरती करून झाल्यानंतर १००८ आदिनाथ जैन सैतवळ मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आचार्यश्रींच्या प्रतिमेचे पुजन केले. धर्मांनुरागी विनोदकुमार देशमाने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. आखिल दिगंबर जैन सैतवळ संस्था, कर्नाटक विभाग सचिव, सचिन देशमाने यांनी सैतवळ संस्थेच्या कार्याबदल माहिती देऊन आचार्यश्रींचा जन्म परिचय विषयी ओळख करून दिली. जेष्ठ श्रविका आलका पुरंत यांनी महाराजच्या समाजाप्रती दिलेले योगदान आणी समाज सुधारणेसाठी केलेले भरीव कार्य याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी स्नेहा नागांवकर हिने सी.ए. फौंडेशनमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळविला याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी साधर्मी श्रावक व श्रविका उपस्थित होते.
प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. नयना ढाणल यांनी आभार मानले. यावेळी विवेक देशामने, अक्षय पुरंत, अशोक पुरंत, सम्मेद देशमाने, वर्धन नागांवकर, दीपक ढाणलं, अतुल कंगळे, सुमंगला ढणाल, स्मिता नागांवकर, संध्या देशमाने, वृषाली देशमाने, वैशाली देशमाने, वेदिका पुरंत, अरुणा पुरंत, सोनिया पुरंत, राजश्री कंगळे, स्वाती कंगळे, राणी देशमाने, स्वाती नागांवकर, मंगल पलसे उपस्थित होत्या.