अबालवृद्धांनी लुटला आनंद
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात शनिवारी (ता.३०) रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळाला. सकाळी सात पहिल्यापासूनच बालचमू, युवक, तरुणी आणि महिलांनी विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण केली. तर लहान मुलांनी आकर्षक पिचकान्यांमधून एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमीच्या आनंद लुटला. शहरातील चौका चौकात संगीताच्या तालावर मनमुरादपणे नृत्य करत होते.
शनिवारी (ता.३०) कांही शासकीय कार्यालये, बँका सुरू असल्याने नियमितपणे कामकाज सुरू होते. अशा ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
शहरातील काही भागात सोसायटी, कॉलनीमधील रहिवाशांसोबत रंग खेळत अनेकांनी आनंद लुटला. याशिवाय शहरातील रस्ते, मैदान आणि उद्याने रंगमय झल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत बालचमू व युवकांचा उत्साह कमी झाला नव्हता. यंदा अनेक एका कुटुंबीयांनी नैसर्गिक रंगांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. रंगपंचमीनिमित्त चौका चौकात ‘रंग बरसे’, ‘रंगात रंगून जा’ अशा विविध गाण्यावरून युवकांनी ठेका धरला होता. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली.
दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षार्थीना त्रास होऊ नये म्हणून शांत वातावरणात रंगपंचमी साजरी केली.
——————————————————————–
निपाणीत बंद सदृश्य परिस्थिती
रंगपंचमी निमित्त शहरातील सर्व व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवले होते. त्यामुळे दुपारपर्यंत शहरात बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.