Monday , December 23 2024
Breaking News

केंद्रात काँग्रेस सत्तेची गरज : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

निपाणीत काँग्रेस मेळावा

निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीर नाम्यातील पाचही योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार लागला आहे. केंद्रात सत्ता आल्यास आणखीन नवनवीन योजना राबवू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षा तर्फे पदाधिकारी, बिएलओ व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, भविष्यात महिलांना आरक्षण, उद्योग, व्यवसाय देण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. प्रियांका जरकीहोळी निवडून आल्यानंतर मतदार संघाचे नंदनवन करणार आहे. अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे. सर्वांनी एकजुटीने प्रियांका जारकिहोळी यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. प्रियांका जारकीहोळी यांनी, काँग्रेस हा सर्वसामान्यांची कामे करणारा पक्ष आहे. सिद्धरामय्या यांनी दिलेल्या योजनांची पूर्तता केली आहे. त्यासाठी या निवडणुकीत आपल्याला भरघोस मतदान करावे.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, सुप्रिया पाटील, अण्णासाहेब हावले, दीपक ढणाल, बक्तीयार कोल्हापुरे, विशाल सुतार, सचिन लोकरे, सुमित्रा उगळे, शाहिदा मुजावर, राजेंद्र वड्डर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत केले. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्यासह राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मेळाव्यास राहुल जारकीहोळी, माजी आमदार शाम घाटगे, राजेश कदम, रोहन साळवे, चंद्रकांत जासूद, बसवराज पाटील, बाळासाहेब देसाई -सरकार, विजय शेटके, निकु पाटील, सुजय पाटील, नवनाथ चव्हाण, शंकरदादा पाटील, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे

Spread the love  राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *