Friday , March 6 2026
Breaking News

पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता-पुत्रांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगांव ज़िल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची रविवारी (ता.७) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. जारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला ऊत आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी उत्तम पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून मनमोकळा संवाद साधला. गतवेळाच्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांची मने आजमावून घेतली. त्यांच्या निर्णयानुसारच आपण पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीत चिक्कोडी मतदारसंघातून काँग्रेस मधून पालकमंत्री जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची भेट महत्त्वाची असल्याचे राजकीय मंडळीतून सांगितले जात आहे. एकंदरीत उत्तम पाटील गट कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहणार आहे. याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव अरिहंत क्रेडिट संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट (मल्टीस्टेट) संस्थेच्या कारदगा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *