राजू पोवार ; रासाई शेंडूरमध्ये दत्त मंदिराची वास्तुशांती
निपाणी (वार्ता) : विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. सध्या युवा वर्ग व्यसनाधीन होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. सध्या मन:शांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. त्यासाठी युवकांनी अध्यात्माकडे वळावे, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. रासाई शेंडूर येथे बालअवधूत भजनी मंडळाच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. त्याच्या वास्तुशांती सोहळ्यात पवार बोलत होते.
मंदिराच्या उभारणीनंतर त्यामध्ये दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरासाठी जागा दान दिल्याबद्दल गुंडू शेवाळे, दिल्याबद्दल राजू तोडकर, चंद्रकांत माने, राजू पोवार, यशवंत तोडकर, पांडूरंग तोडकर, कृष्णात माने, दिनकर डवरी, पांडुरंग बागवाडे, एम. आर. ग्रुप आणि इतर देणगीदारांचा सत्कार झाला. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी बाबू बागवाडे, तानाजी ढोकरे, संभाजी घाटगे, लक्ष्मण सूर्यवंशी, बाळू नाईक, बाळू ताटे, मारुती इंदलकर, संभाजी पाटील, तानाजी पाटील, अमृत शेवाळे, शिवाजी वाडेकर, प्रकाश चव्हाण, संजय नाईक, पांडुरंग तोडकर, धनाजी आंबोले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
—-