
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील जवान सागर आप्पासाहेब बन्ने हे पंजाब (भटिंडा) येथे शहीद झाले. त्याला शुक्रवारी (ता.१२) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आप्पासाहेब बन्ने कुटुंबीयातर्फे येथील बिरदेव मंदिर परिसरात त्यांचे स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे लोकार्पण शुक्रवारी (ता.१२) होत आहे.

शहीद जवान सागर बन्ने एक मेंढपाळ कुटुंब असूनही देश सेवेसाठी त्यांनी अहुती दिली आहे. त्यांच्या आठवणी प्रित्यार्थ कुटुंबीयातर्फे ४० बाय ४० आकारात स्मारक उभारण्यात आले आहे. याशिवाय बन्ने कुटुंबीयांनी अडीच फुटाचा पंचधातूचा अर्ध पुतळा उभारला आहे. मजलट्टी येथील रमेश कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे. बेनाडी परिसरात पहिलाच हा सैनिकाचा पुतळा आहे.
खडकलाट येथील आडवी सिद्धेश्वर मठाच्या स्वामींच्या हस्ते शुक्रवारी (ता.१२) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी परिसरातील उपस्थित राहण्याचे आवाहन बन्ने कुटुंबीयांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta