निपाणी (वार्ता) : येथील दलीत क्रांती सेनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. सहकाररत्न उत्तम पाटील यांनी निपाणी नगरापालिका व जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे यांनी माणगावहुन आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत केले. भीम ज्योतीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. भीम ज्योत आणलेल्या युवकांचा सत्कार झाला.
यावेळी सचिन हेगडे, गोपाळ नाईक, मोहन घस्ते, अजित पोळ, विश्वास माळी, जयसिंग कांबळे, संदीप सूर्यवंशी, रमेश हेगडे, तुळशीदास कदम, संभाजी मुगळे, सचिन माळी, अतिशय शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta