निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी मंगळवारी (ता.४) सकाळी दहा वाजल्यापासून आप्पाचीवाडी येथील रायगड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये मोफत सीईटी अर्ज भरण्याची व्यवस्था केली आहे.
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपये परीक्षा शुल्कसुद्धा कॉलेज कडून देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सिईटी अर्ज भरला असेल तर त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यास त्यांनाही १ हजार रुपये दिले जातील. विद्यार्थ्यांनी येताना सोबत आधार कार्ड, दहावीचे गुणपत्र एक आयडेंटी फोटो आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आशिष जाधव, टायगर दिवाकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.