Thursday , March 5 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.
 प्रारंभी कार्तिक पाटील याने स्वागत केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळातील अनुभव सांगितले.
 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून प्रणव पाटील, उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून राजलक्ष्मी घोरपडे, सर्वगुणसंपन्न म्हणून म्हणून राहुल बगाडे, उत्कृष्ट खेळाडू म्हणून विठ्ठल पाटील व पवन व्हराटे, आदर्श विद्यार्थी म्हणून प्रथमेश कोठूरमट, आदर्श विद्यार्थिनी म्हणून श समृद्धी पाटील, सर्वगुणसंपन्न विद्यार्थिनी म्हणून आदिती घाटगे या विदयार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी, विद्यार्थ्यांनी परिक्षांमध्ये चांगले यश संपादन करून भविष्यामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये नावलौकीक करण्याचे आवाहन केले. यावेळी इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सोनाली पाटील व अमृता माने यांनी सूत्रसंचालन केले. आदर्श स्वामी याने आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *