निपाणी (वार्ता) : तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात बोरगाववाडी येथील आदगोंडा पाटील व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांचा मृत्यू झाला. या मृत नागरिकांना दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब आणि व्हॉलीबॉल ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. आदगोंडा पाटील हे निपाणीतील साई शंकर नगरात वास्तव्यास होते. तसेच ते दौलत नगर येथील व्हॉलीबॉल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. त्यांना दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब आणि व्हॉलीबॉल ग्रुपच्या वतीने शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक संयोगीत उर्फ निकु पाटील, अध्यक्ष वसंत धारव, बबन निर्मले, छोटू पावले यांच्यासह व्हॉलीबॉल ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta