Tuesday , September 17 2024
Breaking News

“अरिहंत”च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित

Spread the love
युवा नेते उत्तम पाटील : निपाणी शाखेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील शेतकरी, व्यवसायिक सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बोरगाव येथे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाखा सुरू करून गरजवंतांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला. त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागला. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ठेवीदार सभासद आणि कर्जदारांच्या विश्वासामुळेच संस्थेची प्रगती झाल्याचे मत युवा उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव कार्यांत संवर्धन संस्थेच्या निपाणी शाखेचा १९ वर्धापन दिन शनिवारी (ता.२) साजरा झाला. यावेळी उत्तम पाटील बोलत होते.
प्रारंभी अनिल कलाजे यांच्या पौरोहित्याखाली अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांच्या हस्ते पूजा घालण्यात आली.
युवा उद्योजक अभिनंदन पाटील म्हणाले, पर्यंत संस्थेने सर्वसामान्यांची गरज ओळखून वेळोवेळी पतपुरवठा सुरू ठेवला आहे. याशिवाय कोरोना, अतिवृष्टी, महापूर अशा आपत्तीच्या काळातही सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेचे मार्चअखेर १२ हजार ७०३ सभासद, ४ कोटी ६४ लाख रुपये भांडवल, ५६ कोटी ३४ लाख रुपये निधी, १ हजार २४ कोटी रुपये ठेवी, ७९४ कोटी रुपयाचे कर्ज वितरण, २२१ कोटी रुपयाची गुंतवणूक, ८ कोटीचा नफा, ७ हजार १६८ उलाढाल,१ हजार ८५ कोटी खेळते भांडवल असून ५० शाखा कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे, चंद्रकांत कोठीवाले, पप्पू पाटील, विलास गाडीवड्डर, संजय सांगावकर, बाळासाहेब देसाई सरकार, निरंजन पाटील, माजी सभापती सुनील पाटील, समीर बागेवाडी, महेश पाटील, जवाहर शहा, प्रकाश शहा, सुधीर अनुजे, रोहन भिवसे, प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, शिरीष कमते, इम्रान मकानदार, संचालक शशिकुमार गोरवाडे, अनिता पाटील, राजू पाटील, सुंदर पाटील, रमेश भोईटे, भाऊसाहेब पाटील, अरुण निकाडे, सतीश पाटील, चेतन स्वामी, केदार कुलकर्णी, के. डी. पाटील, श्रीकांत ढापळे, एल. जी. हजारे सुरेश घाटवडे, पांडुरंग धोंडफोडे, दादासाहेब पाटील, प्रमोद पाटील, सुरेश घाटगे, लक्ष्मण आबने, अभिनंदन बेनाडे आर. एम. बन्ने, सुदेश बागडी, कुमार कापसे, नितीन नेपिरे, अनिल संकपाळ, उमेश पाटील, सचिन खोत, नीलकंठ मगदूम, भुपाल खोत, जयवंत कांबळे, शिवाजी रानमाळे त्यांच्या सभासद ठेवीदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *