Monday , September 21 2026
Breaking News

मोहनलाल दोशी विद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार

Spread the love
 निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे शिक्षक आर. के. धनगर व लिपिक एस. एम. शितोळे यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी  प्रकाशभाई शाह यांनी, सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष विद्यालयाचे
प्रा. मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी सत्कारमूर्तींच्या  सेवाकालावधीतील विविध आठवणी सांगितल्या.
 प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी एस. एस. सांडगे यांनी स्वागत केले. जेष्ठशिक्षिका एस. बी. पाटील, आर. एस. भोसले,  एन. एस. करनुरे, एस. जी. खोत, व्ही. के. चव्हाण यांच्यासह, वैष्णवी माने, ऋतुजा कदम, तनुजा घाटगे, रेणुका सावंत, श्रद्धा नार्वेकर, सावरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, यांच्यासह संचालक व पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.
यावेळी ज्येष्ष्ठ शिक्षिका एस. एम. गोडबोले, कर्मचारी प्रतिनिधी सज्जन कांबळे, मंगल धनगर, रेणू शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एस. के. बुच्चे यांनी सूत्रसंचालन केले तर एस. बी. यादव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *