Saturday , October 19 2024
Breaking News

पारंपारिक वाद्य, लेसर शो मध्ये निपाणीत बापाला निरोप….

Spread the love

तब्बल आठ तास मिरवणूक : महादेव गल्ली मिरवणूक लक्षवेधी
निपाणी (वार्ता): ’गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, डीजे वरील ताल, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला शुक्रवारी (ता.9) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शनिवारी दुपारपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू होती. सायंकाळी चारनंतर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
गणेशोत्सवाचे 51 वर्ष साजरे करणार्‍या येथील महादेव गल्लीतील गणेशोत्सव मंडळाची 11 फुट गणेश मूर्ती अडीच हजार नारळापासून बनवली होती. या मंडळाची विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपणे काढण्यात आली. प्रारंभी मंडळाचे संस्थापक व माजी सभापती सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियंते गजानन वशीकरण व आनंद पणदे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, महेश बागेवाडी, वज्रकांत सदलगे, संजय मोळवाडे, रवी कोठीवाले, दयानंद कोठीवाले, डॉ. महेश ऐनापुरे, मल्लिकार्जुन गडकरी, महेश दुमाले, अण्णासाहेब जाधव, प्रकाश पणदे, सदाशिव चंद्रकुडे, शिवकांत चंद्रकुडे, रवि चंद्रकुडे, अशोक चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, विजय दुमाले, रोहित पाटील, गणेश खडेद, रवींद्र शेट्टी, मल्लेश चौगुले, प्रमोद पणदे, चंद्रकांत चौगुले, निखिल चंद्रकुडे, महांतेश चंद्रकुडे, राहुल चंद्रकुडे,नितीन गुरव, अमोल मोळवाडे,सचिन गुरव, विनय पाटील यांच्यासह एसपी ग्रुप, गणेशोत्सव मंडळ, गणेश हेल्थ क्लब, महादेव मंदिर कमिटी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील महादेव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये इचलकरंजी येथील सुमारे शंभर कार्यकर्ते असलेल्या केसरी ढोल वादन पथक, डीजे, त्या आधुनिक प्रकाश यंत्रणा व साऊंड सिस्टिम सहभागी झाले होते. गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, जुना मोटर स्टँड, कित्तूर चन्नम्मा चौक, कोठीवाली कॉर्नर दलाल पेठ, जत्रावेस मार्गे बागेवाडी विहिरीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन झाले ही मिरवणूक तब्बल आठ तास सुरू होती.
यावर्षी डीजे साऊंड सिस्टीम, पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईत विसर्जन मिरवणुका काढल्या. सायंकाळी सहानंतर मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीतील क्षण सेल्फीसह सोशल नेटवर्कवर शेअर करण्यात येत होते. शुक्रवारी मोठ्या प्रमाण गणेशमूर्तीचे विसर्जन असल्याने मंड पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी नेतृत्वाखाली बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. शहरातील वेदगंगा नदी, दौलतराव पाटील मळ्यातील अंमलझरी रोडवरील विहीर, तलाव आणि विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *