Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत स्पृहणीय यश

बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य खुल्या अजिंक्यपद क्रीडा महोत्सवातील महिलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाने हस्तगत केले, तर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले. कर्नाटक राज्य अमॅच्युअर खो-खो फाउंडेशनतर्फे बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेच्या पुरुष व महिला संघांचा सहभाग होता. …

Read More »

मराठीच्या आस्मितेसाठी महामेळावा होणारच : संतोष मंडलिक

कुद्रेमानी समिती जनजागृती बैठक संपन्न बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावाला बहुसंख्येने सीमाभागातून मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. कुद्रेमानी येथील बलभीम वाचनालयात जनजागृती बैठक ईश्वर क. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृतीचे जतन करून बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सल्लागार रवींद्र गिंडे, संचालक …

Read More »

विधानपरिषद निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने काँग्रेस नेते हताश : मुख्यमंत्री बोम्माई यांची टीका

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला नेहमीच शक्ती प्रदान करण्याचे काम केले आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची परंपरा विधान परिषद निवडणुकीतही कायम राहील. बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच भाजपने आजवर यश संपादित केले आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस …

Read More »

शेतकर्‍यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

समस्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावला आले आहेत. किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलमध्ये भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंदीगवाड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले. …

Read More »

विधान परिषद प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्या बेळगावात

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. मंगळवार दि. 7 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षनेते आणि पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे राज्यप्रवक्ते अ‍ॅड. एम. बी. जिरली आणि …

Read More »

अलीकडे सिद्धरामय्या खोटे बोलण्यास शिकत आहेत : रमेश जारकीहोळी

बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या …

Read More »

…तर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद; शिक्षण मंत्र्यांची माहिती

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही बंगळूर : राज्यातील विशेषत: शाळा, महाविद्यालयातील कोविड सकारात्मक प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर आवश्यक वाटल्यास, कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले. सोमवारी, (ता. 6) …

Read More »

हलगा-मच्छे बायपासला कायमची स्थगिती

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज सोमवारी झालेली न्यायालयीन सुनावणी पूर्णपणे शेतकर्‍यांच्या बाजूने झाली असून न्यायालयाने दाव्याचा अंतरिम निकाल जाहीर होईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या सुनावणीमुळे बायपास रस्त्याच्या कामाला आता कायमचा ब्रेक लागला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत …

Read More »